पुणे, दि. 29 : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कोंढवा खुर्द सर्वे नं. ५ येथील नियोजित ३६ मीटर व २४ मीटर रस्त्यासाठी जागा ताब्यात घेऊन रस्ता रुंदीकरणाच्या कामासंदर्भात, कोंढवा खुर्द येथील नियोजित कुमार पृथ्वी ते शिवनेरीनगर डी.पी. रस्त्याबाबत, क्रीडांगण आरक्षण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लिम समाजासाठी कोंढवा, पुणे येथे हज हाऊस उभारण्याबाबत व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक पार पडली.
यावेळी आमदार चेतन तुपे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.
00000