मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘मराठी भाषेची वाटचाल’ या विषयावर साहित्यिक प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एअर’ या मोबाईल अॅपवर बुधवार, दि. 3, गुरुवार दि. 4 आणि शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.
श्रवण, वाचन यांचा भाषावर्धनातील वाटा, बदलत्या काळात बदलत्या समाजमाध्यमांमुळे येणाऱ्या काळातला मराठीचा प्रवास आणि बदलणारे स्वरूप, जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याकरिता मराठी भाषेतील शिक्षणाचे महत्त्व, गीतरचना करताना बोली भाषेची रंगत, मराठी भाषेचे जतन व संवर्धनासाठी कोणते प्रयत्न व्हायला हवेत आदी विषयांची माहिती श्री. दवणे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.