मुंबई, दि. 2 : मुंबईतील निर्मलनगर, गांधीनगर या वसाहतींच्या पुनर्विकासासंदर्भात परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.
परिवहनमंत्री ॲड.परब म्हणाले, म्हाडाच्या वतीने विकसित करण्यात येणाऱ्या निर्मलनगर, गांधीनगर या भागाचा आराखडा तयार करुन याबाबतचा प्रस्ताव लवकर सादर करावा. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माणमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन यावर निर्णय घेण्यात येईल. वसाहतींच्या पुनर्विकासासंदर्भात स्थानिक लोकांच्या सूचना आणि त्यांच्या अडचणी काय आहेत या समजून घेऊन महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र प्राधिकरण (म्हाडा) यांनी त्याचा आराखडा तयार करावा आणि कालबद्ध पद्धतीने नियोजन करावे आणि रखडलेल्या प्रकल्पांना चालना द्यावी, अशा सूचनाही श्री. परब यांनी केल्या.
000
काशिबाई थोरात/विसंअ/02.02.2021