मुंबई, दि. 23 : थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात मुख्य सचिव संजय कुमार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव श्री. म. धुळे, कक्ष अधिकारी ल.ना. सदाफुले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून संत गाडगे महाराजांच्या कार्याचे स्मरण करून अभिवादन केले.
०००