मुंबई, दि. २५ : – मराठी पत्रकारितेत संपादक म्हणून प्रयोगशील राहिलेले आणि होतकरूंसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ पत्रकार, संपादक म्हणून सदा डुंबरे स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, माध्यमांच्या क्षेत्रातील बदलांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून डुंबरे यांनी संपादक म्हणून प्रयोगशीलता जपली. त्यांनी अनेकांना लिहिते केले. लेखन आणि विषयांत नाविन्य धुंडाळण्याचा प्रवाह डुंबरे यांनी निर्माण केला. नव्या पिढीतील पत्रकारांसाठी ते नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले. प्रयोगशील संपादक म्हणून त्यांचे पत्रकारितेतील योगदान सदैव स्मरणात राहील. ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.