मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘पर्यटनातून रोजगारवृद्धी’ या विषयावर पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एअर या अॅपवरून बुधवार दि. 17, गुरुवार दि. 18 व शुक्रवार दि. 19 मार्च 2021 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यात पर्यटन वाढीसाठी सुरु करण्यात आलेली गाईड योजना, या योजनेचा विस्तार, राज्यात कृषी पर्यटनासंदर्भात घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय, कॅरा व्हॅन धोरण, साहसी पर्यटन धोरण, त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी, पर्यटन महोत्सव यातून होणारी रोजगार वाढ, आंतर जिल्हा पर्यटन वाढीसाठी करण्यात आलेले प्रयत्न, सत्तरवरून दहावर आणण्यात आलेले आदरतिथ्य क्षेत्रासाठीचे परवाने, बीच शॅक धोरण त्यातून होणारी रोजगार निर्मिती, होम-स्टे याबाबत डॉ.धनंजय सावळकर यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
००००