मुंबई, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘पर्यटन व उद्योग क्षेत्रात महिलांना रोजगाराच्या संधी’ या विषयावर उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून गुरुवार, दि. 18 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रसारित होईल. निवेदिका मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राजकारणाबरोबरच प्रशासनातही महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, पर्यटन क्षेत्रातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी, क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, उद्योग क्षेत्रातील महिलांकरिता असलेल्या संधी व योजना आदी विषयांची सविस्तर माहिती राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
****