मुंबई, दि. ७ :- ऑलिंपिक कांस्यपदकविजेत्या बजरंग पूनिया याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले.
उपमुख्यमंत्री म्हणाले, “टोकियो ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या 65 किलो वजनीगटात फ्रीस्टाइल कुस्तीचे कांस्यपदक जिंकणाऱ्या बजरंग पूनिया याचे मनःपूर्वक अभिनंदन. दुखापतीमुळे उपांत्यफेरी जिंकू न शकलेल्या बजरंगने कांस्य पदकासाठीचा सामना ८-० असा निर्विवाद जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. बजरंगने जिंकलेलं कांस्यपदक भारताला पदकतालिकेत आणि कुस्तीला देशात वरच्या स्थानावर घेऊन जाईल, असा विश्वास वाटतो. बजरंग पूनिया, त्याचे प्रशिक्षक, मार्गदर्शक, सपोर्टटीम व चाहत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.