Wednesday, March 22, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

स्मार्ट पीएचसी उपक्रमाचा खासदार शरद पवार यांच्या हस्ते शुभारंभ

स्मार्ट पीएचसी उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६४ प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड

Santosh Todkar by Santosh Todkar
April 2, 2022
in जिल्हा वार्ता, सांगली
Reading Time: 1 min read
0
स्मार्ट पीएचसी उपक्रमाचा खासदार शरद पवार यांच्या हस्ते शुभारंभ
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook
  • स्मार्ट पीएचसी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक- खासदार शरद पवार
  •  आरोग्य संजीवनी उपक्रमांतर्गत स्मार्ट पीएचसी उपक्रमामुळे उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल– पालकमंत्री जयंत पाटील

            सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात माझी शाळा आदर्श शाळा हा उपक्रम सक्षमपणे राबविला जाऊन शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी प्रयत्न केले. याचेच फलित म्हणून मागील वर्षी जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये 7 हजारांने पट संख्या वाढली. येत्या शैक्षणिक वर्षातही मोठ्या प्रमाणात पटसंख्या वाढेल. याच धर्तीवर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करण्यासाठी आरोग्य संजीवनी उपक्रमांतर्गत स्मार्ट पीएचसी हा उपक्रम राबविण्यात येईल. यामुळे विशेषत: ग्रामीण क्षेत्राला उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला तर खासदार शरद पवार यांनी स्मार्ट पीएचसी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरेल तसेच हा उपक्रम राज्यात राबविण्याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री यांना कळविण्यात येईल, असे सांगितले.

            पोलीस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉल मध्ये जिल्हा परिषदेच्यावतीने आरोग्य संजीवनी उपक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण लाड, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्‍य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, विविध प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

            स्मार्ट पीएचसी उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भौतिक सुविधा आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येणार असून ही प्राथमिक आरोग्य केंद्रे सर्व सुविधांनी परिपुर्ण असतील या पध्दतीने त्यांचा विकास केला जाईल. असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा या उपक्रमांतर्गत येत्या दोन वर्षात सर्वांगिण विकास करण्यात येईल. महाविकास आघाडी शासन सत्तेवर आल्यापासून तसेच पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात शैक्षणिक दर्जा सुधारावा व आरोग्य सेवेचे आधुनिकीकरण व्हावे यासाठी धोराणात्मक निर्णय घेण्यात आले. हे सर्व निर्णय जिल्हा प्रशासनानेही अत्यंत चांगल्या पध्दतीने राबविले. त्यामुळे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अभिनंदन करुन पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केला. तरीही बऱ्याचशा मर्यादा येत होत्या त्यामुळे त्याचवेळी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि आज  या उपक्रमाचा शुभारंभ होत आहे. याचे विशेष समाधान आहे. शैक्षणिक उपक्रम यशस्वी ठरला आता आरोग्याचाही उपक्रम यशस्वी ठरेल. त्याचबरोबर जिल्ह्यातील 8 वी ते 10 वी च्या प्रत्येक शाळेत जातीचे दाखले देण्याची मोहिम हाती घेतली. आता 11 वी 12 वी व  पुढील विद्यार्थ्यांना शाळेतच जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचाही उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जेणेकरुन यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ होणार नाही. सर्व सामान्यांना अनेक शासकीय सेवा देण्यासाठी हे शासन प्रयत्नशिल आहे.

स्मार्ट पीएचसी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – खासदार शरद पवार

            खासदार शरद पवार यावेळी म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेने आरोग्य संजीवनी उपक्रमांतर्गत घेतलेला स्मार्ट पीएचसी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून हा उपक्रम आरोग्य सेवेला दिशा देणारा आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना या उपक्रमाची दखल घेण्याबाबत कळविण्यात येईल व सदरचा उपक्रम राज्यात सुरु करण्यासाठी शासनास विनंती करण्यात येईल. यामुळे राज्यात सर्वच आरोग्य यंत्रणेनेचे आधुनिकिकरण होईल व दर्जेदार आरोग्य सेवा राज्याला मिळेल. सांगली जिल्ह्यामध्ये राज्य शासन व स्थानिक प्रशासन यांनी शिक्षण व आरोग्यावर अधिकचा भर दिला आहे, ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. जिल्ह्यातील आरोग्य केंद्र सुधारतील तेव्हा यावेळी रुग्णांना फार मोठा आधार मिळेल.

            कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर सर्व कुटुंब काळजीत पडते आशा वेळी खासगी आरोग्य यंत्रणेत गेल्यास त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चाचण्यांसाठी जावे लागते त्यामुळे खर्चही वाढतो. अशावेळी समान्य माणसाला शासनाच्या आरोग्य सेवेचा खरा आधार लाभतो. त्यामुळेच शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर सांगली  जिल्ह्यात झालेला प्रयत्न राज्यासाठी दिशादर्शक आहे. त्याचबरोबर माझी शाळा आदर्श शाळा हा शैक्षणिक उपक्रम सांगली जिल्ह्यात राबवून शिक्षणाचा दर्जाही सुधारण्याचे काम केले. शैक्षणिक दर्जाबरोबर शाळांचा परिसर, शाळांच्या इमारती यांचाही दर्जा सुधारला यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याचे मनोबलही वाढते. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी ज्या प्रमाणे प्रयत्न केला त्याचप्रमाणे आरोग्याचा दर्जाही सुधारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी केली.

            प्रास्ताविकात जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यावेळी म्हणाले, आरोग्य संजीवनी उपक्रमांतर्गत स्मार्ट पीएचसी करण्यासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 64 प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य सेवांच्या गुणवत्तावाढीस प्रोत्साहन देणे, रुग्णांना आनंददायी व समाधानयुक्त आरोग्य सेवांचा अनुभव देणे, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता सुधारणे व बाह्य संस्थेमार्फत गुणवत्ता तपासणीसाठी मुल्यांकन करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांच्या निधीसाठी जिल्हा नियोजन समिती, राष्ट्रीय आरोग्य अभियान, 15 वा वित्त आयोग, जि. प. स्विय निधी, स्थानिक विकास निधी, सीएसआर फंड यामधून निधी घेण्यात येणार आहे. तसेच या उपक्रमासाठी सेवाभावी संस्था व लोकसहभागही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

            खासदार शरद पवार यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलनाने स्मार्ट पीएचसी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलिप माने यांनी मानले.

Tags: शरद पवारशुभारंभस्मार्ट पीएचसी
मागील बातमी

पर्यावरणाचा समतोल ठेवून मुंबईचा विकास करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढील बातमी

नाना-नानी पार्कने सांगलीच्या वैभवात भर- खासदार शरद पवार

पुढील बातमी
नाना-नानी पार्कने सांगलीच्या वैभवात भर- खासदार शरद पवार

नाना-नानी पार्कने सांगलीच्या वैभवात भर- खासदार शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 8,400
  • 12,173,878

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.