मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे डॉ. तेजस गर्गे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे. गुरुवार, दि. 5 मे 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
महाराष्ट्राला केवळ भूगोल नाही तर संस्कृती आणि खूप मोठा इतिहास आहे. येथील गड किल्ल्यांच्या भिंतींतून हा इतिहास आपल्या खुणावत असतो. या वारसा जतनाचे हे कार्य फार मोठे आहे. आपला हा उज्ज्वल इतिहास नव्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावा यासाठी पुरातत्व विभागाचे कार्य सुरु आहे. या विभागाचे कार्य, त्याचा उद्देश आणि त्याची सद्यस्थिती, याविषयीची सविस्तर माहिती डॉ. गर्गे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
००००