भंडारा, दि. 15 : अनेक ज्ञात ,अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या असीम कष्टाने स्वातंत्र्य मिळालेले आहे. म्हणूनच त्या स्वातंत्र्याला जपणे आपले प्रथम आणि नैतिक कर्तव्य आहे. राष्ट्राभिमान ठेवत नागरिक म्हणून आपली सगळी मूलभूत कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे व लोकशाहीत सक्रियतेने सहभाग घेणे हे आपले अग्रकर्तव्य असले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज केले.
पोलीस कवायत मैदानावर आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर भाषण करतांना ते बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक लोहीत मतानी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यासह प्रशासनातील सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भंडारावासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात श्री. कदम यांनी लोकमान्य टिळक गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जिल्हा असुन स्वातंत्र्य लढ्यातील जिल्हयातील शुरवीरांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. आद्यकवी मुकुंदराजांनी आंभोरा येथे विवेकसिंधू ग्रंथ लिहिला. भंडारा शहरात 150 वर्षांची वाचक परंपरा जपणारे सार्वजनिक वाचनालय आहे. प्राचीन काळात मौर्य, सातवाहन, शुंग, वाकाटक या राजवंशांनी तर मध्ययुगात चालुक्य, राष्ट्रकूट, राजपूत, गोंड, भोसले यांनी येथे दीर्घकाळ राज्य केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हयाने गेल्या वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने कृषी, आरोग्य, शिक्षण यांचा प्रगतीपर आढावा त्यांनी मांडला. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानात सन 2021-22 मध्ये एकूण 266.4 लाख प्राप्त निधीपैकी शंभर टक्के निधी खर्च झाला आहे. सन 2022-23 मध्ये योजनेकरिता एकूण 291.65 लाखांचे नियोजन असून यात खरिपात 1 हजार 125 पीक प्रात्यक्षिके व रब्बी हंगामात 2 हजार 725 पीक प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान मध्ये जिल्ह्याला 2021-22 आर्थिक वर्षात 210.37 लाख निधी प्राप्त झाला असून कृषी यंत्र व औजारे घटकावर हे अनुदान 239 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण अभियानात 2021-22 या आर्थिक वर्षात जिल्ह्याला एकूण 262.78 लाख निधी प्राप्त झाला असून हा सर्व निधी 312 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील गेल्या आठवड्यातील पुरपरिस्थीती बाबत नुकसानीबाबतचे पंचनामे करण्यात आले असून लवकरच संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे श्री.कदम म्हणाले.
मोफत सायकल वाटप योजना मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अनुसूचित जातीच्या इयत्ता 8 ते 12 च्या विद्यार्थीनींना सन 2021-22 या शैक्षणिक सत्रात प्रती तालुका 10 प्रमाणे तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली व लाखांदूर या पाच तालुक्यात 49 मोफत सायकल वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमात मुख्य ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस, गृहरक्षक दल, छात्रसेना व विद्यार्थी यांची संयुक्त मानवंदना व संचलन करण्यात आले. त्यानंतर पावसामुळे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम हा पोलीस सभागृहात घेण्यात आला. तत्पूर्वी,सकाळी 8.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचाकार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे संचालन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले.
00000
स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या
अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार
भंडारा, दि. 15 : पोलीस कवायत मैदानावर आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते पोलीस सभागृहात करण्यात आला. यावेळी पोलीस अधिक्षक लोहीत मतानी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यासह प्रशासनातील सर्व वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
एकात्मीक फलोत्पादन अभियान सन 2021-22 मध्ये अविनाश कोटांगले, तालुका कृषि अधिकारी, भंडारा, विजय हूमने, मंडळ कृषि अधिकारी, भंडारा, प्रधान मंत्री कृषि सिंचाई योजना सन 2021-22 मध्ये किशोर पत्रीकर, तालुका कृषि अधिकारी, लाखनी, स्वप्नील झंझाड, मंडळ कृषि अधिकारी, साकोली, चंदन मेश्राम, कृषि पर्यवेक्षक-2, साकोली, कृषि यांत्रिकीकरण अभियान सन 2021-22 मध्ये आदित्य घोगरे, तालुका कृषि अधिकारी, पवनी, हूकूमचंद रामटेके, मंडळ कृषि अधिकारी, लाखांदूर, अरविंद राऊत, कृषि पर्यवेक्षक-2, लाखांदूर, प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2021-22 मध्ये आदित्य घोगरे, तालुका कृषि अधिकारी, पवनी, शिवाजी मिरासे, तालुका कृषि अधिकारी, मोहाडी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2021-22 मध्ये गोपाल मेश्राम, कृषि सहाय्यक, पिंपळगाव/स ता. लाखनी, स्मिता मोहोरकर कृषि सहाय्यक, परसोडी/ना.. ता. लाखांदूर, यशोदा कोरी कृषि सहाय्यक, जांभळी/स ता. साकोली व गूणवत्ता नियंत्रण योजना सन 2021-22 मध्ये प्रदीप म्हसकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, भंडारा यांना सन्मानीत करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुके प्रथम साकोली, द्वितीय लाखांदूर, तृतीय मोहाडी यांना वितरीत करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम मोखे ता. साकोली, द्वितीय लवारी ता. साकोली, तृतीय बोद्रा ता. साकोली यांना वितरीत करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट क्लस्टर प्रथम पं.स. साकोली, व्दितीय पं.स. लाखांदूर, तृतीय पं.स. पवनी यांना वितरीत करण्यात आला. राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुका प्रथम लाखनी, द्वितीय पवनी, तृतीय भंडारा यांना वितरीत करण्यात आला. राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम मांगली ता. पवनी, व्दितीय सालेभाटा ता. लाखनी, तृतीय खांबाडी ता. पवनी यांना वितरीत करण्यात आला व राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट क्लस्टर प्रथम पं.स.पवनी, व्दितीय पं.स.तुमसर, तृतीय पं.स. भंडारा यांना जिल्हाधिकारी कदम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
000