मुंबई, दि. 3 : कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज सकाळी मंत्रालयात पहिल्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन आपल्या कामकाजाला प्रारंभ केला.
राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील विस्तारीत इमारतीमधील पहिल्या मजल्यावर दालन क्र. 115 व 117 या ठिकाणी कामगार मंत्र्यांचे कार्यालय आहे. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल व मंत्री श्री.खाडे यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
0000