केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले गणेशाचे दर्शन

मुंबई, दि.५: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी  सहकुटुंब गणेशाचे दर्शन घेतले.

यावेळी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री  अमित शहा यांना गणेश मूर्ती भेट दिली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार पूनम महाजन, आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर  बावनकुळे, आमदार ॲड. आशिष  शेलार, माजी मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.