‘दिलखुलास’ कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची सोमवारी मुलाखत

मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दिनांक 9, मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत  प्रसारित होणार आहे.

पुणे येथे जी 20 परिषदेच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांची सुरु असलेली तयारी, जी20 परिषदेमुळे विकासाला मिळणारी गती, पुण्यातील प्रकल्प, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग विभागातील उपक्रम याविषयी मंत्री श्री. पाटील यांनी  ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून विस्तृत माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000

सागर कुमार कांबळे/स.सं