मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. 16 जानेवारी व मंगळवार दि. 17 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.
महाराष्ट्राने उद्योगक्षेत्रात लौकिक निर्माण केला आहे. देशाच्या प्रगतीचे इंजिन असलेल्या महाराष्ट्रात सर्वाधिक स्टार्टअप निर्माण झाले आहेत. नव उद्योजकांसाठी महाराष्ट्राने नेहमीच लाल गालिचा अंथरलेला आहे. राज्यात आतापर्यंत 18 टक्के स्टार्टअपची नोंदणी झाली आहे. प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी ई गव्हर्नन्स ही संकल्पनाही राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्ताने शासनाच्यावतीने रोजगारक्षम उमेदवारांना हक्काचा रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळाव्यांचे कशाप्रकारे आयोजन करण्यात येत आहे याविषयी सविस्तर माहिती डॉ. रामास्वामी एन. यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.