जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यातील कौशल्य परिसंस्थेचा होणार विकास

मुंबई, दि. 3 : जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी मंत्रालयामध्ये राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची नुकतीच भेट घेऊन विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा केली. जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील कौशल्य परिसंस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

राज्यातील कौशल्य परिसंस्थेचा विकास करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक अभ्यास करण्यासाठी जागतिक बँकेच्या भारतातील शिक्षण प्रमुख शबनम सिन्हा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासमवेत जागतिक बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, जागतिक बँकेच्या सहकार्यातून कौशल्य परिसंस्थेचा विकास करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन करून या प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असून, कौशल्य परिसंस्थेचा विकास करण्यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी  सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

000000

इरशाद बागवान/विसंअ