शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांनी सहाय्यक अनुदानासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

0
4

मुंबई, दि. 21 : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत योजनेंतर्गत शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदानासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सहाय्यक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या महसूल विभागातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

विहित नमुन्यातील अर्ज आणि नियम www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर नवीन संदेश या शीर्षकाखाली उपलब्ध आहे. संस्थांनी अर्ज सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, महात्मा गांधी मार्ग, मुंबई- 400032 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2023 असून त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार होणार नसल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.

000

श्रीमती वर्षा आधंळे/व.सं.स./

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here