स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ व समाधी स्थळ विकास आराखड्याच्या नावात अंशत: बदल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
6

मुंबई, दि. 2 : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ मौजे तुळापूर ता. हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) शिरूर येथील विकास आराखड्यास नियोजन विभागाने दि. २८ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या नावामध्ये अंशतः बदल करण्यात आला असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम 46 अन्वये विधानपरिषदेत केले.

या विकास आराखड्याच्या नावात अंशतः बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित नाव ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, तालुका हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.), शिरूर, जि.पुणे विकास आराखडा, असे निश्चित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here