‘दिलखुलास’ कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त अपर मुख्य सचिव अनुपकुमार

मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि. 31 मार्च 2023 व शनिवार दि. 1 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि पुढाकारामुळेच, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. अन्नसुरक्षेचे अहारातील महत्त्व सर्वसामान्य जनतेला समजावे म्हणून देशभरात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून मिलेट विपणन आणि मुल्यसाखळी या विषयावर सहकार आणि पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी माहिती दिली आहे. त्यांनी केलेले हे मार्गदर्शन आपण ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ऐकणार आहोत.

00