उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून नागरिकांनी खबरदारी घ्यावी – डॉ. विनायक सावर्डेकर

0
10

मुंबई, दि. 19 : राज्यात उष्णतेच्या लाटांमुळे उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यामुळे नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन सेंट जॉर्ज रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात केले आहे.

जगभरात वातावरणात अनेक बदल होत असून, अचानक येणारी वादळे, पाऊस आणि उन्हाळ्यात उष्णतेची लाट वाढत आहेत. वातावरणीय बदल अलिकडच्या काळात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि वारंवारता वाढलेली दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात उष्णतेच्या लाटा वाढत असून त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम पहावयास मिळत आहे. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी नागरिकांमध्ये कशाप्रकारे जनजागृती करण्यात येत आहे आणि उष्माघात होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवरील माहिती डॉ. विनायक सावर्डेकर यांनी जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 20 एप्रिल 2023 सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. ही मुलाखत वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हा कार्यक्रम पाहता येईल.

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here