पुणे,दि.25 (विमाका) :- कृषी आयुक्तालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ सभागृहाचे उद्घाटन आणि लोकार्पण आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयुक्त कृषी सुनील चव्हाण, संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक सुभाष नागरे, निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील, मृदसंधारण व पाणलोट संचालक रवींद्र भोसले, संचालक आत्मा दशरथ तांभाळे उपस्थित होते.
फित कापून सभागृहाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. नूतनीकरणानंतर सभागृहातील सोई सुविधांची माहिती आयुक्त कृषी श्री.चव्हाण यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००