इमारतींचा पुनर्विकास करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

0
4

मुंबई,दि.२५ :  इमारतींचा पुनर्विकास करताना नियमांचे उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. प्राप्त तक्रारींबाबत विकासकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

काळंबादेवी येथील मुंबई महापालिकेच्या सी वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, विकासक इमारतींचा पुनर्विकास करताना नियमांचे उल्लंघन करत आहेत अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच इतर तक्रारींवर स्थानिक अधिकारी यांनी तत्काळ कार्यवाही करावी. या कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नये. काळंबादेवी येथील सी वॉर्ड येथे १२९० तक्रारीपैकी आज दाखल झाल्या असून जागीच १४० तक्रारींचे निराकरण महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सी वॉर्ड येथे बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली.

जी वॉर्ड येथे गुरूवार दिनांक २७ एप्रिल रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी तीन ते ५.३० या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here