मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनोज गोहाड,निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल,उप जिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ,आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबई उपनगर पालकमंत्री श्री.लोढा यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक, स्वतंत्र सेनानी, नागरिक, अधिकारी, कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री.लोढा म्हणाले की, सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रोज लोक दरबार भरविला जाईल. यात आता अन्य विभागाच्या तक्रारीही स्वीकारल्या जातील, असे मंत्री श्री.लोढा यांनी घोषणा केली.
आज 1 मे, 2023 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शासन सेवेत नियुक्तीसाठी पात्र ठरलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांना मुंबई उपनगर पालकमंत्री श्री.लोढा यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. यात मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता वस्तू व सेवा कर विभागात राज्य कर निरीक्षक म्हणून रोहीत अनिल हाके, श्रीमती अंकिता निवृत्ती कोकाटे, कुनाल भगवान मोरे, महेश सुनिल अरडे आणि श्रीमती माया लक्ष्मण शेळके यांचा समावेश आहे. तसेच, जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयात भूकरमापक या पदाकरीता श्रीमती सोनल सत्यवान कांबळे, श्रीमती प्रगती बाळासाहेब नरवडे, श्रीमती वैष्णवी गणेश वैती, श्रीमती याचना संपत वाकचौरे, श्रीमती पुजा कैलास सुरवडे आणि श्री. आदित्य दत्तात्रय भालेराव यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे, सन 2021-22 च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण पालकमंत्री श्री.लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यात गुणवंत पुरुष खेळाडू मध्ये श्री.अक्षय प्रकाश तरळ, गुणवंत महिला खेळाडू मध्ये श्रीमती रुपाली सुनिल गंगावणे आणि गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून अनिल तुळशीराम थोरात यांना प्रमाणपत्र, स्मृति चिन्ह व रोख रक्कम रु.10 हजार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे यांचेकडून मंडळातील कार्यरत सुरक्षा पर्यवेक्षक राजेश व्ही. सावंत, सुरक्षा रक्षक संदिप पी. भेलकर, आर. वी. नायर आणि सहायक सुरक्षा अधिकारी व्ही.कें.बनकर यांना त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी प्रोत्साहनात्मक मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
000