महिला व बालविकास विभागामार्फत चेंबूर येथे योग दिन उत्साहात साजरा

मुंबई, दि. २१ : महिला व बालविकास विभागामार्फत चेंबूर येथील बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प येथे योगदिन उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला.

००००

संध्या गरवारे/विसंअ/