Wednesday, November 20, 2024
Home 2024

Yearly Archives: 2024

ताज्या बातम्या

बुधवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी राज्यभरात कायदा व सुरक्षा यंत्रणा सतर्क व सजग

0
आचारसंहिता कालावधी दरम्यान राज्यभरात ५३२ एफ.आय.आर. मुंबई, दि. १९ : 'महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४' अंतर्गत बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात मतदान होत आहे. ही सर्व प्रक्रिया...

लोकशाहीच्या उत्सवासाठी कर्मचारी मतदान साहित्य घेऊन रवाना

0
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली निवडणूक सज्जतेची पाहणी सांगली, दि. 19 (माध्यम कक्ष) : जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी लोकशाहीचा उत्सव साजरा होत असून या उत्सवात जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा...

मतदानासाठी मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना  

0
२० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान ५० टक्के मतदान केंद्रावर असणार वेब कॅमेराची नजर १५२३ मतदान केंद्रावर होणार मतदान मोबाईल मतदान केंद्रास घेऊन जाण्यास प्रतिबंध धाराशिव, दि.१९ (माध्यम कक्ष)  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर  रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानासाठी जिल्हयातील उमरगा, तुळजापुर,उस्मानाबाद आणि परंडा या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य सोबत घेऊन अतिशय उत्साहाच्या वातावरणात कर्मचारी आज १९ नोव्हेंबर रोजी रवाना झाले.  २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक सामान्य, खर्च व पोलीस यांनी १७ नोव्हेंबर रोजी आयोजित आढावा सभेत घेतला. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील १५२३ मतदान केंद्रावर मतदान पथके रवाना झाली.१५२३ मतदान केंद्रापैकी ५० टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंगद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. निवडणूकविषयक गैरप्रकारांच्या तक्रारीबाबत नागरिकांना सी-व्हिजिल अँपद्वारे तक्रार दाखल करता येईल. निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने विधानसभा मतदारसंघात १२७ पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी व होमगार्ड असे एकूण ३१५७ कर्मचारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ३  तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहे. उमेदवार,उमेदवारांचे प्रतिनिधी,मतदान प्रतिनिधी व मतदार यांना मोबाईल (भ्रमणध्वनी) घेऊन मतदान केंद्रात प्रवेश करु नये अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिली.

मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना; प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज  

0
21 लाख 34 हजार 500 मतदार बजावणार मतदानाचा हक्क जिल्ह्यात 2 हजार 288 मतदान केंद्र निवडणूकीसाठी 9 हजार 152 अधिकारी व कर्मचारी 51 हजार 155...

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदान करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे आवाहन

0
अमरावती, दि. 19 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता उद्या, 20 नोव्हेंबर रोजी सर्वत्र मतदान आहे. मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजता सुरु होऊन...