मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य‘ मासिकाच्या जून-२०२३ च्या शिक्षण-प्रशिक्षण विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
शिक्षण-प्रशिक्षण विशेषांकामध्ये शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, इतर मागास बहुजन कल्याण आदी विभागांच्यावतीने राज्यात राबविण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण शिष्यवृत्ती योजनांचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सेवांचा लाभ सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी राज्यात सुरु असलेल्या “शासन आपल्या दारी” या अभियानाचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच ‘मंत्रिमंडळात ठरले’ या सदराचाही समावेश करण्यात आला आहे.
हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच http://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.
000
000
000