रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टर; केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी

0
2

मुंबई, दि. ३० :- केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला आहे. त्यामाध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

केंद्र शासनाच्या भारतीय पादत्राणे, चर्मोद्योग आणि साहित्य विकास कार्यक्रमाच्या उपयोजनेतून पादत्राणे आणि चर्मोद्योगासाठी हा विशाल समूह प्रकल्प करण्यात येणार आहे. ३२३ कोटींच्या या प्रकल्पासाठी १२५ कोटी रुपये केंद्र शासनाने मंजूर केले आहेत. उर्वरित पायाभूत सुविधांच्या खर्चाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.

केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील रातवड औद्योगिक क्षेत्राची निवड केली त्यातून सुमारे २५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा  उपलब्ध होणार आहेत.

राज्यात विविध औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत नुकतीच ४० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता दिली आहे.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here