ठाणे, दि. 3 : गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे येऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
तसेच मुख्यमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार राहुल शेवाळे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, आदी उपस्थित होते.
000