महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या सदस्यपदाची आनंद लिमये, सुरेंद्र बियाणी यांनी घेतली शपथ

मुंबई, दि. 11 :- महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगावर सदस्यपदी नियुक्त आनंद मधुकर लिमये व सुरेंद्र जगन्नाथ बियाणी या सदस्यांचा आज शपथविधी झाला.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त सदस्यांना शपथ दिली.

यावेळी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष संजय कुमार, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (पारेषण) डॉ संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (निर्मिती) पी अन्बलगन हे उपस्थित होते.

—000—

केशव करंदीकर/विसंअ/