ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 24 : “आपल्या अभिनयाने नाटक, चित्रपट, मालिका आणि ओटीटी अशा विविध माध्यमांत अमीट ठसा उमटवणारे, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनाने केवळ एक उत्तम अभिनेता नाही, तर अनेक कलाकारांचा मार्गदर्शक हरपला आहे”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “जयंत सावरकर यांनी चार पिढ्यांसोबत काम केले. त्यांनी मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका केल्या. त्यांचे विश्व इतके अनुभवसिद्ध होते की त्यातून नव्या पिढ्या घडत होत्या. एक ऊर्जावान आणि आपल्या विचारांवर ठाम असलेला अभिनेता आपण गमावला आहे. त्यांनी साकारलेला ‘अंतू बर्वा’ कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना”!

0000