‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ.रवींद्र सिंगल यांची २७ जुलैला मुलाखत

मुंबई दि. २६ :- रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी शासन सर्वप्रकारच्या उपाययोजना करीत आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करत वाहन चालविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक  डॉ. रविंद्र सिंगल यांनी केले आहे.

रस्ता सुरक्षा ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. त्याअनुषंगाने शासनामार्फत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर ई-चलान कारवाई झाली असेल तर ते जाणून घेण्यासाठी आणि ई-चलानचा दंड सुलभरित्या भरण्यासाठी किंवा ई-चलान संदर्भात काही तक्रार असल्यास नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासनस्तरावर कशी खबरदारी घेण्यात येत आहे, याबाबत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून डॉ. सिंगल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. 27 जुलै 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००