मुंबई, दि. 27 : सन १८७४ मध्ये स्थापन झालेल्या मुंबईतील अंजुमन- ई – इस्लाम शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेच्या १५० व्या वर्षाचा उद्घाटन सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी अंजुमन समुहातील विविध संस्थांमध्ये अध्यापन करीत असताना पी.एचडी. प्राप्त करणाऱ्या ५७ अध्यापकांचा तसेच विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अंजुमन संस्थेच्या मुंबई सेन्ट्रल येथील सैफ तय्यबजी मुलींच्या शाळेच्या सभागृहात झालेल्या सत्कार सोहळयाला ‘अंजुमन’चे अध्यक्ष डॉ झहीर काझी, वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच संस्थेचे विश्वस्त प्राचार्य, शिक्षक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
००००
Governor launches 150th Anniversary Celebrations of Anjuman I Islam’
The yearlong celebrations of the 150th anniversary of Anjuman I Islam institution was launched in presence of Maharashtra Governor Ramesh Bais in Mumbai on Thursday (27 July).
The Governor felicitated 57 faculty members and students of various educational institutions of Anjuman-I-Islam who obtained Ph. D. degrees at the function held at Anjuman’s Saif Tyabji Girls High School, Mumbai Central.
President of Anjuman-I-Islam Dr. Zahir Kazi, Vice Chancellor of University of Mumbai Dr. Ravindra Kulkarni, Senior Vice President of ‘Anjuman’ Mushtaq Antulay, Principals, teachers and alumni of various Anjuman institutions were present.
0000