लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात आदरांजली  

0
16

मुंबई, दि. 1 :  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानभवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले, सह सचिव मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, अध्यक्ष यांचे सचिव सुनिल वाणी, उप सभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव विजय कोमटवार, मोहन काकड, सुरेश मोगल व संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

00000

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here