स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

0
7

मुंबई, दि. 15 :  भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण झाले.

यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. तसेच  शहिदांच्या वीरपत्नींचा यावेळी जिल्हाधिकारी यांनी सन्मान केला.

जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर यांनी शहीद वीरचक्र प्राप्त स्कॉड्रन लीडर  परवेझ रुस्तम जमास़्जी (वायुसेना) यांच्या वीरपत्नी झारीन जमास़्जी,  शौर्यचक्र प्राप्त स्कॉड्रन लीडर मनोहर राणे (वायुसेना) यांच्या वीरपत्नी माधवी राणे, शहीद लान्स नायक दिपक धोंडू गावडे (भूदल) यांच्या वीरपत्नी वंदना गावडे यांचा सन्मान केला.  तसेच, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत उत्कृष्ट काम केलेले डॉ. आर. कूपर हॉस्पिटल, मुक्ता किडनी अँड डायलिसिस सेंटर, के. ई. एम. हॉस्पिटल परळ, जे.एस. ओ. अँड जागर, मेडिकलच्या प्रतिनिधींचा यावेळी सन्मान पत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, उपजिल्हाधिकारी  जयराज कारभारी, एकनाथ नवले, अभिजित घोरपडे , रवींद्र राजपूत, तहसीलदार आदेश डफळ, तहसीलदार प्रियांका ढोले, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुपेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here