आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा विषयक कामांना प्राधान्य द्या – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

0
7

        सांगली दि. १७ (जिमाका) : जिल्ह्यात विविध विकास कामे व उपक्रम राबवितांना आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा विषयक कामांना प्राधान्य द्या, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या.

जिल्ह्यातील विविध यंत्रणांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते.

या बैठकीत साठवण तलाव भरणे, आयटी पार्क, टेक्सटाईल पार्क, अंगणवाडीत वजनकाटे पुरवणे, सोलार एनर्जी, वैद्यकीय महावद्यालयात एमआयआर व सीटी स्कॅन मशीन या बाबतचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here