‘वॉर अगेंस्ट व्हायरस’आपण निश्चित जिंकणार
पंतप्रधान,केंद्राकडून पुरेसे सहकार्य
मुंबई, दि 19 : कोरोनाचा मुकाबला म्हणजे जागतिक युद्ध असून याचा सामना करण्यासाठी राज्यातील जनता निश्चितपणे शासनाला सहकार्य करीत आहे, त्यामुळे आपण ही साथ अजून तरी नियंत्रणात ठेवली आहे मात्र आणखीही शर्थीचे प्रयत्न केले तर महाराष्ट्र या संकटावर मात करेल. मी स्वत: आज देखील पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी यासंदर्भात बोललो असून त्यांनी राज्याला पुरेपूर सहकार्य केले जाईल हे सांगितले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियावरून लाईव्ह प्रसारणाद्वारे सांगितले. जनतेने घाबरून जाऊन जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य,औषधांचा साठा करू नये, असेही आवाहन त्यांनी केले.
गर्दी पूर्ण बंद करा
मुख्यमंत्री म्हणाले की,नागरिकांनी सरकार ज्या ज्या सुचना देत आहे तेवढ्या काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. आमच्या आवाहनानंतर सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर गर्दी खूप कमी झाली आहे. मात्र तरी देखील आपण गर्दी पूर्ण बंद केली पाहिजे. आपण शासकीय कार्यालय,खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे तरीसुद्धा आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम या पद्धतीने काम करा,सूचनांचे आणखी काटेकोर पालन केले पाहिजे.
आपण ज्या उपाययोजना करीत आहोत त्या समाधानकारक असल्या तरी विषाणू एकेक पाऊल पुढे टाकत असल्याने अधिक काळजी घेतली पाहिजे. यंत्रणेमध्ये काम करणारीही माणसेच आहेत. त्यांच्यावरचा भार वाढेल असं कृत्य आपल्याकडून व्हायला नको.
होम क्वारंटाईन व्यक्तींनी फिरू नये
आज सर्वच रुग्ण बाहेरून लागण झालेले आहेत. बाहेरची लोकं देखील आपलीच आहेत,नातेवाईक आहेत. मात्र त्यांनी इथे येतांना सर्व काळजी घेऊन येणे महत्त्वाचे आहे. होम क्वारंटाईन करणाऱ्यांच्या हातांवर शिक्के मारले आहेत,त्यांनी देखील आसपास वावरू नये. आपल्या परदेश प्रवासाची माहिती लपवून प्रवास करू नका.
हे विषाणुशी युद्ध
युद्ध हे जिद्दीने लढायचे असते आणि जिंकायचे असते,अनेकांनी 1965 आणि 1971 चे युद्ध पाहिले असावे,अनुभवले असावे. युद्धाचा अनुभव वाईट असतो. युद्धानंतरची परिस्थिती वाईट असते. देशासाठी छातीचा कोट करून आपले जवान लढतात,धारातीर्थी पडतात. कोरोनाशी ज्या पद्धतीने लढतो आहोत त्यावरून मला 1971 चे युद्ध आठवते. आजचे युद्ध हे विषाणुशी युद्ध आहे.“वॉर अगेंस्ट व्हायरस.”युद्ध सुरु झाले आहे.
आपले जवान म्हणजे आपले डॉक्टर,नर्सेस,बसचे चालक,स्वंयसेवी सामाजिक संस्था यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. आपण त्यांना घरी राहून सहकार्य करू शकत नाही का?
संकट हे काही जात,पात,धर्म पाहून येत नाही. आपण एकजुटीने मुकाबला केला तर हे संकट आपलं काहीही वेडवाकडं करू शकत नाही, शकणार नाही. चीनमध्ये या विषाणुचा पहिल्यांदा प्रादुर्भाव आढळला पण आता चीनने अनेक कडक उपाययोजना केल्यामुळे यातून ते बाहेर पडत आहेत. आपल्याला ही बाहेर पडायचे आहे. त्याकरिता पुन्हा एकदा सहकार्य करा,आपण नक्की या संकटातून बाहेर पडू असा मला विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
00000
We will surely win this ‘war against virus’
Docs, nurses are soldiers
People urged to avoid crowd, follow instructions
Sufficient assistance from PM, Centre
……………………………….
CM assures people in a live telecast
Mumbai, Mar 19: Fight against coronavirus is a global war and with people cooperating with the state we have contained this pandemic as yet. But we will overcome this danger if Maharashtra makes utmost efforts. I have talked today with the Prime Minister and Union Health Minister in this regard and they assured all the cooperation to our state.
This was stated by Chief Minister Uddhav Thackeray in a live telecast on social media. He urged people not to get panicky and store essential commodities, food grains, and medicines.
Avoid crowd totally
The Chief Minister asked the people to strictly follow the instruction given by the administration. Though the crowd at religious places was reduced it is not completely avoided. We must avoid crowd totally, he said. We have taken a decision to reduce the number of employees at government, private offices. Don’t venture outside when it is not needed. Follow ‘work from home’ wherever possible and follow the instructions strictly.
The precautionary measures we are taking are satisfactory but the virus is inching ahead step by step forcing us to be more careful and vigilant. People are managing the systems and we should not overburden them.
Home quarantine persons should not roam
All patients have been infected from outside. They are all our people, relatives. But they should come hereafter taking all the care. Home quarantine patients are stamped on their hands. They should remain confined to isolation and do not travel concealing information about your foreign travel.
This is a war against the virus
War has to be fought with determination and won. Many have witnessed and experienced the 1965 and 1971 wars. The experience of war is never good. The post-war situation is not better either. Soldiers fight for the country, sacrifice their lives. The way we are fighting with coronavirus, I am reminded of the 1971 war. Today we are fighting a war against the virus. The war has begun.
Doctors, nurses are our soldiers. Bus drivers, NGOs are working day and night for this. Can we not cooperate with them by remaining at home?
Calamity does not strike looking at cate, religion, and creed. When we unitedly fight this calamity would not harm us, cannot. This virus was first found in China but now China has taken strict measures and is coming out of this attack. We also have to come out. For that, cooperate. I am confident that we will overcome this calamity, the Chief Minister said.
00000
‘वॉर अगेंस्ट वायरस’ हम निश्चित तौर पर जीतेंगे
डॉक्टर्स, नर्सेस यानी लड़नेवाले जवान
जनता द्वारा भीड़ करना बंद हो, सूचनाओं का पालन करें
प्रधानमंत्री, केंद्र की ओर से मिल रहा सहयोग
——————
‘लाईव प्रसारण’ में मुख्यमंत्री ने दिलाया आश्वासक विश्वास
मुंबई : कोरोना का मुकाबला करना यानी वैश्विक युद्ध की तरह है. इसका सामना करने के लिए राज्य की जनता निश्चित तौर पर सरकार को सहयोग कर रही है. इससे हम इस बीमारी पर अबतक नियंत्रण रखे हुए है. लेकिन और प्रयास किए जानेपर महाराष्ट्र इस संकट पर मात कर सकेगा. मैं स्वयं आज भी प्रधानमंत्री और केंद्रीय स्वास्थ्य मंत्री के साथ इस सन्दर्भ में बातचीत की है. उन्होंने राज्य को यथासंभव सहयोग करने का आश्वासन दिया है, ऐसा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज सोशल मीडिया द्वारा किए लाईव प्रसारण द्वारा बताया. जनता ने न घबराते हुए जीवनावश्यक वस्तू, अनाज, औषधि की जमाखोरी न करे, ऐसा आवाहन भी उन्होंने कहा.
भीड़ पूर्ण रूप से बंद करे
मुख्यमंत्री ने कहा, नागरिकों ने सरकार द्वारा दी जारी सूचनाओं का पालन किया जाना होगा. हमारे आवाहन के बाद सभी धर्मों के प्रार्थना स्थलों पर भीड़ काफी कम हुई है, लेकिन फिर भी हमारे द्वारा पूरी भीड़ कम होनी चाहिए. हमने सरकारी औऱ निजी कार्यालयों में कार्यरत कर्मियों की उपस्थिति कम करने का निर्णय लिया है. फिर भी आवश्यकता नहीं है तो घर के बाहर न निकले. जहां संभव है वहा वर्क फ्रॉम होम पद्धति से काम करें, सूचनाओं का कड़ाई से पालन होना चाहिए, ऐसा उन्होंने कहा.
हम जो उपाययोजना कर रहे है वो समाधानकारी है फिर भी यह विषाणू एकेक कदम आगे आ रहा है, इसलिए सावधानी बरतना आवश्यक है. यंत्रणा में काम करनेवाले लोग भी इंसान ही है, उनके ऊपर बोझ आनेवाला कृत्य न हो, ऐसा उन्होंने कहा.
होम क्वारंटाईन व्यक्ति बाहर न घूमें
आज सब मरीज बाहर से बाधित होकर आए है. बाहर से आए लोग भी अपने ही है, अपने मेहमान है. लेकिन उन्होंने भी यहां आते समय सावधानी बरतनी जरूरी है. होम क्वारंटाईन किए मरीजों के हाथ पर मुहर लगाई है, उनके द्वारा भी सावधानी बरती जाए तो अच्छा है. अपने विदेश दौरे की जानकारी छुपाकर यात्रा न करें, ऐसा भी श्री ठाकरे ने कहा.
यह युद्ध विषाणु के साथ
युद्ध जिद के साथ लड़ना होता है और जितना होता है. कईयों ने 1965 और 1971 का युद्ध देखा है, अनुभव किया है. युद्ध के अनुभव बुरे होते है. युद्ध के बाद कि स्थिति बेहद नाजुक होती है. देश के लिए जी जान लगाकर हमारे जवान लड़ते है, शहीद होते है. कोरोना से हम जिस प्रकार लड़ रहे है, उसे देखकर मुझे 1971 के युद्ध का स्मरण हो रहा है. आज का युद्ध विषाणु क्व खिलाफ युद्ध है. “वॉर अगेंस्ट वायरस.”का युद्ध शुरू हुआ है.
हमारे जवान यानी हमार डॉक्टर, नर्सेस, बस ड्रायवर, स्वंयसेवी सामाजिक संस्था इसके लिए दिनरात कार्यरत है. क्या हम उन्हें घर में बैठकर सहयोग नहीं कर सकते? दिवसरात्र काम करत आहेत.
संकट जाती या धर्म देखकर नहीं आता, हमनव एकजुट दिखाकर इस संकट का सामना किया तो यह संकट हमारा कुछ बिगाड़ नहीं पाएगा. चीन में इस विषाणु का पहिली बार प्रादुर्भाव दिखाई दिया लेकिन चीन ने कई कड़ी उपाययोजना की इसलिए अब चीन इस संकट से बाहर निकल रहा है. हमें भी इससे बाहर निकलना है. इसके लिए आपका सहयोग जरूरी है, हम इस संकट से जरूर बाहर निकलेंगे, ऐसा मुझे विश्वास है, ऐसा मुख्यमंत्री ने कहा.
००००