शेवटपर्यंत मातीशी एकनिष्ठ राहणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई, दि. १ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानांतर्गत कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मातीला नमन करून पूजन केले. शेवटच्या श्वासापर्यंत आपण मातीशी एकनिष्ठ राहणार असल्याचे मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल, अपर पोलीस महासंचालक रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मातीला वंदन करून पूजन केले.

यावेळी मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले की, मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत देशभर मातीच्या पूजनाचा आणि मातीला वंदन करण्याचा उपक्रम सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या मातीशी जोडले पाहिजे. मातीशी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मतदारसंघात मेरी माटी, मेरा देश कार्यक्रम ठिकठिकाणी होत आहेत. मात्र व्यस्त कामामुळे गावाकडे मातीचे पूजन करणे शक्य झाले नसल्याने, आज मुंबईत मातीला वंदन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

०००

धोंडिराम अर्जुन/ससं/