औरंगाबाद, दि :9 (जिमाका)- ‘मराठवाडा मुक्ती संग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने येथे होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज सर्व विभागांचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना ,पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्यासह ,जलसंधारण कृषी, शिक्षण , विविध विभागाचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रकल्पासाठी आवश्यक निधीची मागणी, तसेच विविध विभागातील वेगवेगळ्या कामासाठीचे प्रस्ताव याबाबत आढावा पालकमंत्री भुमरे यांनी घेतला. जिल्ह्यातील शिक्षण विभागाअंतर्गत शाळा खोल्या बांधकाम , कृषी, रस्ते विकास , पर्यटन, वैद्यकीय शिक्षण, आरोग्य विभाग यांच्यामार्फतही काही प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या. शासकीय दंत महाविद्यालय, पर्यटन, पोलीस स्टेशनसाठी, पोलिसांच्या निवास व्यवस्थेसाठी प्रस्ताव, महापालिकेचे, भूमिगत गटार योजना,स्मशानभूमी, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, शहरात 5 प्रवेशद्वाराचे निर्मिती याबाबत मागणी प्रस्ताव, जिल्हा परिषद अंतर्गत जलसंधारण आणि आरोग्य विभागाच्या आरोग्य विभागाच्या बळकटी करणासाठी, क्रीडा विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचा रिंगरोड उड्डाणपूल ,रस्ता अशा प्रस्तावांचा आढावा घेतला.
०००००