राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका स्वाती देशमुख यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दि.२०, २१, २२ सप्टेंबरला मुलाखत

0
2

मुंबई, दि. १८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, मुंबई येथील शिल्प निदेशक (कोपा) शिक्षिका स्वाती देशमुख यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. यामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, मुंबई येथील शासकीय प्रशिक्षण संस्था, लोअर परळ या संस्थेतील शिल्प निदेशक श्रीमती देशमुख यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्ताने श्रीमती देशमुख यांनी आपल्या वाटचालीबद्दल, शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन व योगदानाबद्दल ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि. 20, गुरुवार दि. 21 आणि शुक्रवार दि. 22 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

जयश्री कोल्हे/स.सं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here