कोकण विभागातील सर्व जिल्हा माहिती कार्यालयांचे अधिकृत ‘व्हॉटसॲप चॅनल’

नवी मुंबई, दि.21- मुख्यमंत्री सचिवालय पाठोपाठ कोकण विभागाअंतर्गत सर्व जिल्हा माहिती कार्यालयांनी आपले व्हॉटसॲप चॅनल तयार केले आहे. या व्हॉटसॲप चॅनलच्या माध्यमातून कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाद्वारे घेण्यात आलेले सर्व निर्णय व योजनांची व्यापक प्रसिध्दी करण्याकरीता प्रसारमाध्यमांचा वापर करण्यात येणार आहे.

शासनाने  घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासनाच्या योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती कोकण विभागाच्या DD(Information)Konkan या चॅनलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. तसेच कोकण विभागीय माहिती कार्यालयांतर्गत येणारे जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे,रायगड, रत्नागिरी व पालघर यांचेही व्हॉटसॲप चॅनल तयार करण्यात आले आहेत. हे व्हॉटसॲप चॅनल पुढीलप्रमाणे आहेत.

विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन

DD(Information)Konkan  https://whatsapp.com/channel/0029Va9VxWaBfxo8QrfmvO3D

जिल्हा माहिती कार्यालय,ठाणे DIO Thane https://whatsapp.com/channel/0029Va4jJZAFCCoUWw9cse1a

जिल्हा माहिती कार्यालय,रत्नागिरी

Ratnagiri Dio https://whatsapp.com/channel/0029Va4Ml7QHQbRw3uHTDv28

जिल्हा माहिती कार्यालय,पालघर

DIO Palghar https://whatsapp.com/channel/0029VaA8mVk0Vyc9XNCSUa1f

जिल्हा माहिती कार्यालय,रायगड

Dio Raigad – Alibag  https://whatsapp.com/channel/0029Va4jSwP0LKZF4bn0Sf1k

जगभरात संवादाचे प्रभावी व उपयुक्त माध्यम ठरलेल्या  ‘व्हॉटसॲप’ने चॅनलच्या माध्यमातून नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.  प्रमाणित असलेल्या या चॅनलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोकणातील जनतेला कोकणाच्या सर्वांगिण विकासाशी संबंधित शासनाचे निर्णय व योजनांची माहिती देण्यासाठी सध्या एक्स (ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, थ्रेडस, कू आदी समाजमाध्यम तसेच इनस्टन्ट मेसेजिंग ॲपचा वापर केला जातो.

चॅनलला असे करा फॉलो :

व्हॉटस ॲपवरील ‘अपडेट्स’ मेनूमध्ये गेल्यावर तिथे चॅनल सेक्शन असून तिथे ‘Find channels’ मध्ये वर नमूद चॅनलचे नाव टाईप केल्यावर चॅनलच्या यादीमध्ये हे प्रमाणित चॅनल दिसेल, त्याला क्लिक करुन फॉलो केले की तुम्हाला सर्व अपडेट्स विनासायास उपलब्ध होणार आहेत. सर्वांनी चॅनलला सबक्राईब करावे असे आवाहन कोकण विभागीय उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांनी केले आहे.

०००