राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त प्राध्यापक केशव सांगळे यांची ‘दिलखुलास’ मध्ये दि. २, ३, ४ ऑक्टोबरला मुलाखत

0
9

मुंबई, दि. २७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त वीरमाता जिजाबाई टेक्नॉलोजिकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय), मुंबई येथील उच्च शिक्षण विभागातील प्रा. केशव सांगळे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या देशभरातील शिक्षकांची यादी जाहीर झाली असून यामध्ये व्हीजेटीआय मुंबई येथील उच्च शिक्षण विभागातील प्रा. सांगळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्ताने प्रा. सांगळे यांनी आपल्या वाटचालीबद्दल, शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन व योगदानाबद्दल ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. २, मंगळवार दि. ३, आणि बुधवार दि. ४ ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here