मृद व जलसंधारण विभागाच्या विविध कामांचा मंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा

मुंबई दि.10 : मृद व जलसंधारण विभागांतर्गत  छत्रपती संभाजीनगर येथील वाल्मी संस्थेच्या परिसर व संकुलाचा पुनर्विकास व पुननिर्माण आराखडाकर्मचारी निवृत्तीवेतनप्रकल्प नियंत्रण यंत्रणातुकाई उपसा सिंचन योजना (ता.कर्जत जि.अहमदनगर)कयाधू नदीवरील बंधारे योजना (जि.हिंगोली) आणि कोतवाल लघु पाटबंधारे योजना (ता.पोलादपूर जि.रायगड) या विविध कामांचा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज आढावा घेतला .

मंत्रालयात आयोजित बैठकीस आमदार प्रा. राम शिंदेमृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,  महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरेवाल्मी संस्थेचे महासंचालक वि. बा. नाथमृद व जलसंधारण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. राठोड म्हणाले कीजल व भूमी व्यवस्थापन संस्था ( वाल्मी) छत्रपती संभाजीनगर परिसर व संकुलाचा पुनर्विकास व पुननिर्माण आराखडा तयार करताना प्रामुख्याने वर्तमान इमारत संरचनाप्रशासकीय कार्यप्रणाली ,व्यावसायिक उपक्रम यासह भविष्यातील गरजा विचारात घेऊन मूलभूत सुविधा नव्याने स्थापत्य तसेच प्रशिक्षण विषयक कार्यक्रमांमध्ये आवश्यक बदल प्रस्तावित करावेत. वाल्मी संस्थेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन योजनेबाबत विधी व न्याय विभाग आणि वित्त विभागाशी प्रस्ताव पाठवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

तुकाई उपसा सिंचन योजना योजनेचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री श्री. राठोड यांनी दिले. या कामासाठी अधिकचा निधी लागला, तर तो सुद्धा देण्यात येईल. जलसंधारण उपचार बांधकामे अंतर्गत शून्य ते सहाशे हेक्टर सिंचन क्षमतेच्या प्रकल्पांचे बांधकामदेखभाल दुरुस्तीसाठी सूचीबद्ध केलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची व विभागाची कार्यकक्षाव्याप्तीकार्यपद्धती व मार्गदर्शक तत्वे निश्चिती करण्याचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

तसेच कयाधू नदीवरील बंधारे योजना आणि कोतवाल लघु पाटबंधारे योजना येथील विविध कामाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर आराखडे सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी दिले.

000