दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबईदि. 18 : राज्यात दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्याचा येतो. त्याप्रमाणे याही वर्षी ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर२०२३ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे केंद्रीय दक्षता आयोगाने जाहीर केले आहे. या सप्ताहाकरीता यावर्षी “भ्रष्टाचाराला नाही म्हणा – राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा” (Say no to corruption; commit to the Nation) ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.

या सप्ताहानिमित्त कार्यालयांच्या दर्शनी भागात व सार्वजनिक ठिकाणी (जसेरेल्वेस्थानकबस थांबेविमानतळेइत्यादि) भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीविषयक भित्तिपत्रकेकापडी फलक, साइन बोर्ड लावण्यात यावेत. व्हॉट्सॲपइत्यादी इलेक्ट्रॉनिक समाजमाध्यमांचाई-मेल्सएस.एम.एस. यांचाही जनजागृतीसाठी वापर करण्यात येणार आहे.

मुंबईपुणे यासारख्या मोठ्या शहरांतील मोक्याच्या ठिकाणी व्हेरीएबल मेसेज सिस्टिम फळकाद्वारे भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीविषयक संदेश प्रसारीत करण्यात येणार आहेत. भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी कार्यालये, शाळामहाविद्यालयांच्यास्तरावर वादविवाद स्पर्धा ,व्याख्यानेनिबंधस्पर्धाकार्यशाळाचर्चासत्र मुलाखती यांचे आयोजन करण्यात येणार आहे. भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीविषयक विशेष पुस्तिकांचे प्रकाशन व वाटप करण्यात येणार आहे.

राज्यातील अशासकीय संघटनास्वयंसेवी संस्थासामान्य नागरिकांना दक्षता जनजागृती मोहिमेत मोठ्या प्रमाणावर, उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याकरीता आवाहन करण्यात येणार आहे. त्याकरीता पथनाट्येनाटिकाकाव्यवाचनइ. नाविन्यपूर्ण व आकर्षक योजना, कार्यक्रमांची आखणी करणे, राज्य शासनाचे सर्व विभागविभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीविषयक विविध स्पर्धा, व्याख्याने, निबंधस्पर्धा इ. उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुखकार्यालय प्रमुखराज्य शासनाचे अंगीकृत उपक्रमसहकारी संस्थास्वायत्त संस्थांमार्फत या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

दिनांक ३० ऑक्टोबर२०२३ रोजी सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाच्या प्रतिज्ञेने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. विभाग प्रमुखकार्यालय प्रमुख किंवा ज्येष्ठतम अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारीकर्मचारी प्रतिज्ञा करतील. या सप्ताहाच्या निमित्ताने मा. राज्यपाल व मुख्यमंत्री महोदयांचा संदेश राज्यातील जनतेसाठी देण्यात येणार आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/