महाआरोग्य शिबिरात १० लाखापेक्षा जास्त भाविकांच्या मोफत आरोग्य तपासणीचे नियोजन – आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

0
4

मुंबई, दि. 18 : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर (जि. धाराशीव) येथे देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. भाविकांचे मोफत आरोग्य तपासणी करीता महाआरोग्य शिबिराचे आयोजन तुळजापूर येथे 2728 व 29 ऑक्टोंबर 2023 रोजी करण्यात येत आहे. या शिबिरात 10 लाखांपेक्षा जास्त भाविकांच्या मोफत आरोग्य तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. वैद्यकिय अधिकारी आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून भाविकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध 25 ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेतअशी माहिती सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबीराच्या आयोजनाबाबत बैठकीचे आयोजन आज आरोग्य भवन येथे करण्यात आले होते. बैठकीला मार्गदर्शन करताना  मंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी मुंबईतील विविध रुग्णालयातील डॉक्टर आणि सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री डॉ. सावंत म्हणाले कीतेलंगणाकर्नाटकआंध्रप्रदेशसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतील भाविक तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी येतात. अशा भविकांपर्यंत शासन पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी या ठिकाणी 25 आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेत.  सामाजिक संस्था आणि खासगी रुग्णांलयातील डॉक्टरांच्या मदतीने त्यांना या आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. यावेळी गरजूंना चष्माव्हीलचेअरवॉकर अशा वस्तूही पुरविण्यात येणार आहेत.   सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बाइक ॲम्ब्युलन्सही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी आपले योगदान देण्याचे आवाहनही मंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here