मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 10 डिसेंबर रोजी असणाऱ्या ‘मानवी हक्क दिनानिमित्त’ राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य सचिव दिलीप गावडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी 10 डिसेंबर हा ‘मानवी हक्क दिवस’ म्हणून निश्चित करण्यात आला आहे. कोणत्याही देशाच्या नागरिकांच्या मानवी हक्कांचे रक्षण हा त्या देशातील लोकशाही व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. सामान्य जनतेच्या मानवी हक्काचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारकडून सक्षम व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. यासाठी देशपातळीवर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग तर राज्य पातळीवर राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या दिनानिमित्ताने नागरिकांचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत, याचबरोबर राज्य मानवी हक्क आयोगाची रचना, कार्यपद्धती आणि अधिकार काय आहेत याबाबत सविस्तर माहिती राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य सचिव श्री. गावडे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून आयोगाचे सदस्य सचिव श्री. गावडे यांची मुलाखत शनिवार दि. 9 आणि सोमवार दि. 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत रविवार, दि. 10 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदिका रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स – https://x.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
००००