‘महालक्ष्मी सरस’ला मुंबईकरांचा भरभरून प्रतिसाद

0
1

मुंबई, दि. २९ : वांद्रे (पूर्व) येथील एम.एम.आर.डी.ए मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस २०२३-२४ ला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. महालक्ष्मी सरसच्या भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉलला मुंबईकर भेट देत असून खरेदीतून विविध कला व कौशल्यांचा आस्वाद घेतल्याचे दिसून येत आहे.

महालक्ष्मी सरसच्या फूड कोर्टवर खवय्यांनी गर्दी केलेली दिसून आली. कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, खानदेशी मांडे व देशभरातून आलेल्या विविध खाद्य व्यंजनांचा मुंबईकर आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.

मुंबईसह विविध ठिकाणाहून सहकुटुंब सहपरिवार याठिकाणी भेटीसाठी नागरिक येत आहेत.

दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महालक्ष्मी सरस प्रदर्शनात उज्ज्वला खेडेकर यांच्या मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन, प्रसिद्ध शाहीर देवानंद माळी यांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देत आहेत.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here