पुणे दि.३१: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नवीन वर्ष २०२४ च्या शुभेच्छा देताना जनतेने दिलेल्या प्रेमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मावळते वर्ष २०२३ मध्ये विधान परिषदेचे शताब्दी महोत्सव वर्ष असल्यामुळे अनेक कार्यक्रम झाले. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सर्व आमदार तसेच विधान परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी आभार मानले.
पत्रकार, अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि जनतेने दिलेल्या प्रेमाविषयीदेखील डॉ. गोऱ्हे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अनेक वर्षांपासून प्रलंबित महिलांच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न २०२३ मध्ये सुटला, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या राजकीय इच्छाशक्तीबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.
येणाऱ्या नवीन वर्षात निवडणुका होणार असून सर्वांनी मतदान करावे, असे आवाहनही डॉ.गोऱ्हे यांनी केले आहे.
येणारे वर्ष महाराष्ट्र आणि देशासाठी प्रगतीचे आणि भरभराटीचे जावो. तसेच नागरिकांना सुख, समृद्धी आणि आनंदाचे जावो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
०००