सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी बंद करा; राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम, मेळावे थांबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निर्देश

0
5

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य

मुंबई, दि. 16 : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्यशासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. यादृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा-अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण,उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. याक्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम,समारंभ,मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, मुख्य सचिव अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त असली तरी ती काही गुन्हेगार नाही. तिला योग्य औषधोपचार आणि मानसिक आधारही द्या. राज्यात लागू असलेला साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात. नागरिकांमध्ये भीती आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. राज्यात जे रुग्ण दाखल आहेत त्यातील उपचाराला प्रतिसादही देत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नियम सर्वांना सारखे असून धार्मिक सण-उत्सव, समारंभांसोबतच राजकीय कार्यक्रमांनाही परवानगी देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. परदेशातील टुर्सना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्य शासन कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये याकरिता राज्यातील सर्व धार्मिक उत्सव रद्द करावेत. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळांमध्ये दैनंदिन पूजाअर्चा व धार्मिक विधी शिवाय भाविकांसाठी तेथे प्रवेशास काही दिवस प्रतिबंध करावा. व्यापक जनहित लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याचा वापर प्रभावीपणे करावा. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात. ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या निवडणूका तीन महिने पुढे ढकलण्याचा प्रस्ताव दिला आहे. कोरोनाच्या आपत्कालीन उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीचा पहिला हप्ता  म्हणून 45 कोटी रुपये विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असून ज्या प्रवाशांना घरी राहून क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. ही सर्व कार्यवाही करताना त्याला मानवी चेहरा असावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

यावेळी घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय असे :

·      राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तीन महिने पुढे ढकलण्याचा प्रस्ताव

·      ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवणार.

·      कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक 5 कोटी रुपये असे 45 कोटींचा पहिला हप्ता देणार.

·      ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहेत त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल.

·      केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.

·      आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार.

·      उद्यापासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय.

·      नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी.

·      होम क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.

·      धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा.

००००

Highest priority to prevent spread of Corona infections

Stop crowds of devotees at all the religious worship places

Stop political programs and conventions

Chief Minister directs to district collectors

Mumbai, March 16- Stating that preventing Corona virus spread was highest priority and situation was under control so far because of steps taken by state Government, chief minister Uddhav Thackeray has directed all the district collectors to prevent crowds at religious places during regular daily religious rituals. Chief Minister made it clear that it was responsibility of collectors to ensure that prevention of epidemic act was strictly implemented and after the calamity of Corona disease was over the religious festivities and celebrations can take place as usual. He also directed that for preventing spread of disease, no convention or program of political organizations and parties should take place.

Chief Minister on Monday had a video conference with all the divisional commissioners, district collectors from his official residence Varsha bungalow. Minister for industries Subhash Desai, health minister Rajesh Tope, minister for tourism Aditya Thackeray, minister of state Rajendra Patil-Yadravkar, chief secretary Ajoy Mehta, principal secretary to the health department Dr Pradeep Vyas were present.

Stating that any person who is infected with Corona virus was not a criminal, chief minister directed the officials to ensure treatment as well as counselling for such a patient. He asked the officials to undertake campaign to create awareness among people towards prevention of epidemic act since it was in the interest of people. He said that those who have been found positive and are quarantined need to be provided with necessary facilities and counselling. He also informed that the patients in the state who are admitted to hospitals are giving response to the treatment.

Chief Ministers directed the district administration that law and rules were for everyone and there should not be any permission for either political programs or religious festivities or celebrations. He said that citizens who have been advised to be home quarantines need to stay at home and take care of others in addition to themselves. He told that while closing down schools in rural places, it was to be ensured that sanitisers and soap as well as water are available at public toilets. By stating that state Government was taking all the measures to prevent Corona virus impact, chief minister appealed to citizens to remain alert.

Asking the officials to ban all the religious festivities to prevent spread of Corona virus infection, the devotees need to be stopped at religious places with an exception of daily worships and religious rituals. Asking the district collectors to effectively implement law in larger public interest, chief minister told to close down all the schools in rural areas. He told that elections to the village Panchayats and local bodies have been postponed by three months. Stating that divisional commissioners would be given total of Rs. 45 crores as first instalment for implementing emergency measures to prevent Corona virus infections. By asking the officials to implement home quarantine for the travellers who have been told to go for home quarantine, chief minister appealed the officials to undertake these measures with maintaining the human face of the same.

Important decisions taken

Local body elections postponed for three months

Rural schools also to be closed down

Divisional commissioners to be given Rs 45 crores for undertaking emergency measures including Rs. 15 crores and Rs. 10 crorss to Konkan and Pune divisional commissioner while Rs. 5 crores each to Nagpur, Amravati, Aurangabad and Nashik divisions as first instalment.

Provide facilities of food, TV sets, carrom boards at quarantine places

To identify persons who have been asked to be home quarantined, a stamp would be imprinted on their left hand to prevent them from coming to open places. Dubai, US and Saudi Arabia also included in the list of seven countries declared by Union Government for quarantine.

District administration asked to spend for ventilator and other equipment if needed by availing from local markets.

Visitors would not be allowed in Mantralaya from tomorrow which is Tuesday

Citizens asked to approach district administration by using mails for their grievances and district administration asked to respond to such mails in seven days

staff from local police stations to be appointed for approaching to those who have been home quarantined

taking participation of religious leaders and elected representatives for effective implementation of law for larger public interest.

0000

अजय जाधव/विसंअ/16.3.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here