नोंदणीकृत, अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा – नंदकुमार काटकर

0
11

मुंबई, दि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘अभय योजना’ या विषयी नोंदणी व मुद्रांक विभागाचे सह नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक अधीक्षक नंदकुमार काटकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ग्राहकांना नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळावी यासाठी मुद्रांक सवलतीची ‘अभय योजना’ लागू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना सन 1980 ते 2000 या कालावधीतील तसेच 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीतील जुने दस्तऐवज आणि दंडामध्ये सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत दोन टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 31 जानेवारी 2024 पर्यंत, तर दुसऱ्या टप्प्यात 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत सवलत देण्यात येणार आहे.  ग्राहकांना ही सवलत कशा स्वरूपात दिली जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरू आहे. याचबरोबर भारतीय नोंदणी कायदा आणि महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम काय आहे, याबाबतची माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सह नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक अधीक्षक श्री. काटकर यांनी दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. काटकर यांची मुलाखत सोमवार दि. 22, मंगळवार दि. 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here