मुंबई उपनगर जिल्ह्यात अंतिम मतदार यादीत नवमतदारांची लक्षणीय वाढ

0
5

मुंबईदि. २४ – मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये नवमतदारांची संख्या लक्षणीय वाढली असल्याची माहिती तेजस समेळउपजिल्हा निवडणूक अधिकारीमुंबई उपनगर जिल्हा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार यादी अद्ययावतीकरण तसेच शुद्धीकरण महत्वपूर्ण असते. भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येतो. यंदाच्या वर्षी ही दी. २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या दरम्यान विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादीमध्ये २६ हजार ६२९ मतदारांची निव्वळ वाढ होऊन एकूण मतदारांची संख्या ७२ लाख १७ हजार ३०८ इतकी झाली आहे. तसेच स्त्री – पुरुष गुणोत्तर ८५१ वरून ८५६ इतके झाले आहे. गेल्या अनेक वर्षांनतर स्त्री – पुरुष गुणोत्तरामध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात पुरुष मतदारांची संख्या ३८ लाख ८८ हजार ६०३ इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या ३३ लाख २७ हजार ९० ५ आहे. तृतीयपंथी मतदारांची संख्या ८०० असून दिव्यांग मतदारांची संख्या १४ हजार ११३ इतकी असल्याचे श्री. समेळ यांनी सांगितले.   

या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ वर्ष वयोगटातील १९ हजार ३६० मतदारांची नव्याने भर पडली आहे. तसेच २० ते २९ या वयोगटातील २५ हजार २३२ मतदारांची वाढ झालेली आहे. जुलै ते  ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली होती. या सर्वेक्षणात मृत मतदारकायमस्वरूपी स्थलांतरील मतदार, तसेच दुबार मतदारांची यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पूर्ण करण्यात आलीअशी माहिती श्री. समेळ यांनी दिली.           

मतदार याद्यांमध्ये एकसारखे छायाचित्रे असलेल्या १४ हजार ७८ मतदारांची नावे सखोल तपासणी अंती वगळण्यात आली. तसेच नाव व इतर काही तपशील समान असलेल्या ४ हजार५५३ मतदारांचीही सखोल तपासणी करून नावे वगळण्यात आली. संबंधित मतदारांना गृहभेटीनोटिसा पाठवून तसेच पूर्ण तपासणी अंती कायदेशीररित्या ही नावे वगळणी करण्यात आल्याचेही ते म्हणाले.             

जिल्ह्यात एकूण ७ हजार ३५३ मतदान केंद्र आहेत. दिव्यांग मतदारांना ये-जा करणे सोयीचे करण्याच्या दृष्टीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने मुंबई उपनगर जिल्ह्यातील १७ गृहनिर्माण संकुलांमध्ये मतदान केंद्र ठेवण्यात आली आहेत. आणखी किमान ५० ते ६० गृहनिर्माण संकुलांमध्ये अशा प्रकारे मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. ‘स्वीप’ अंतर्गत मोबाईल डिस्प्ले व्हॅनसोशल मीडियामतदान प्रात्यक्षिकेमतदानासाठी प्रोत्साहन देणारे कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यामाध्यमातून मतदान जागृती करून मतदानाचा टक्का वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचेही श्री. समेळ यांनी सांगितले. 

मतदार नोंदणी कार्यक्रम हा निरंतर चालणारा कार्यक्रम आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०२४ पर्यंत १८ वर्षे वय पूर्ण होणारे नव मतदारही आगाऊ किंवा पूर्वनोंदणी करता आली. तसेच नाव नोंदणी न केलेल्या युवकांना नाव नोंदणीची अजूनही संधी आहे. २३ जानेवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल” या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/जाऊन यादीत आपले नाव आणि सर्व तपशील योग्य असल्याचे व सोबतचे मतदान केंद्र तपासून घ्यावे. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्जभरून मताधिकार सुनिश्चित करावाअसे आवाहनही यावेळी श्री. समेळ यांनी केले.

000

हेमंतकुमार चव्हाण/वि.सं.अ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here